28 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमुंबई'मराठी माणसाच्या मेहनतीवरच मुंबई देशाची आर्थिक राजधानी बनली' - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘मराठी माणसाच्या मेहनतीवरच मुंबई देशाची आर्थिक राजधानी बनली’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

टीम लय भारी

मुंबईः राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल केलेल्या विधानावरुन महाराष्ट्रातील लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. या प्रकरणामध्ये प्रत्येकाने आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या मताशी सहमत नसल्याचे म्हटले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज मालेगावमध्ये होते. त्यावेळी त्यांनी आपण भगतसिंह कोश्यारींच्या मताशी सहमत नसल्याचे म्हटले आहे. हे राज्यपालांचे वैयक्तीक विधान आहे. आम्ही त्यांच्या मताशी सहमत नाही. संयुक्त महाराष्ट्रासाठी 106 जण हुतात्मे झाले. मराठी माणसांमुळेच मुंबईला हे वैभव प्राप्त झाले आहे. त्यामुळे कोणाचाही अवमान होणार नाही याची काळजी घेतली राज्यपालांनी घेतली पाहिजे.

मुंबईसाठी बाळासाहेबांचे मोठे योगदान आहे. राज्यपालांनी कोणाचाही अवमान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. मराठी माणसाच्या मेहनतीवरच मुंबई देशाची आर्थिक राजधानी बनली आहे. इतर कोणालाही त्याचे श्रेय घेता येणार नाही. मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेची स्थापना झाली. मुंबईत किती संकटे आली तरी मुंबई थांबत नाही. प्रत्येकाच्या पोटा पाण्याचा प्रश्न मुंबई सोडविते. मुंबई विषयी बाळासाहेबांची जी भूमीका आहे तिच आमची भूमीका आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. भाजपचे नेते अशिष शेलार यांनी देखील आपण राज्यपालांच्या मताशी सहमत नसल्याचे म्हटले आहे. भगत सिंह कोश्यारी यांनी राज्याची माफी मागवी अशी मागणी केली जात आहे.

मात्र यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. मुंबई महाराष्ट्राचा स्वाभिमान तर आहेच. शिवाय ती देशाची आर्थिक राजधानी सुद्धा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी माणसाच्या या भूमीत राज्यपाल म्हणून मला सेवेची संधी मिळाली, याचा मला अभिमानच आहे. त्याचमुळे अतिशय अल्पावधीत मराठी भाषा अवगत करण्याचा मी प्रयत्न केला. काल राजस्थानी समाजाच्या कार्यक्रमात मी जे विधान केले. त्यात मराठी माणसाला कमी लेखण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता. केवळ गुजराती आणि राजस्थानी मंडळांनी व्यवसायात दिलेल्या योगदानावर मी बोललो. मराठी माणसांनीच कष्ट करून महाराष्ट्राला उभे केले. म्हणूनच आज अनेक मराठी उद्योजक नावाजलेले आहेत. ते केवळ महाराष्ट्रात नाही, तर भारतात आणि जगभरात मोठ्या दिमाखात मराठीचा झेंडा रोवून आहेत. त्यामुळे मराठी माणसाचे योगदान कमी लेखण्याचा कुठे प्रश्नच निर्माण होत नाही.

पण नेहमीप्रमाणे माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाच्या कष्टाचे योगदान सर्वाधिक आहेच. अलीकडे प्रत्येक बाबतीत राजकीय चष्म्यातून बघण्याची दृष्टी विकसित झाली आहे, ती आपल्याला बदलावी लागेल. एका समाजाचे कौतुक हा दुसऱ्या समाजाचा अपमान कधीही नसतो. कारण नसताना राजकीय पक्षांनी त्यावर वाद निर्माण करू नये. किमान माझ्या हातून तरी मराठी माणसाचा अवमान कधीही होणार नाही विविध जाती, समुदाय यांनी नटलेल्या या मराठी भूमीच्या प्रगतीत, विकासात सर्वांचेच योगदान आहे आणि त्यातही मराठी माणसाचे योगदान अधिक आहे असेही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यावेळी म्हणाले.

हे सुध्दा वाचा:

बाळासाहेब ठाकरे असते तर, राज्यपालांना धुतलं असतं

विद्यमान संकटातूनच उद्धव ठाकरे शिवसेनेला मजबूत करतील

जयंत पाटलांनी राज्यपालांना दुसऱ्या राज्यात जाऊन राहण्याचा दिला सल्ला

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी